बाल साहित्य पुरस्कार जाहीर

बालसाहित्यिक संगीता बर्वे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार
बाल साहित्य पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणार्‍या साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कारांची (Announcement of Children's Literature Awards) घोषणा केली आहे. यात प्रसिध्द लेखिका संगीता बर्वे (Famous writer Sangeeta Barve) यांना 'पियूची वही' या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा 'साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार' जाहीर झाला आहे.

अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 22 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली आहे.

'मृगतृष्णा' आणि 'दिवसाच्या वाटेवरून' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. 'गंमत झाली भारी', 'झाड आजोबा', 'खारुताई आणि सावली', 'उजेडाचा गाव' हे त्यांचे मुलांसाठीचे कवितासंग्रह असून 'पियूची वही' ही कांदबरी विशेष प्रसिध्द आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com