हौशी राज्य नाट्य, बालनाट्य स्पर्धा घोषित

प्रवेशिकांची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत
हौशी राज्य नाट्य, बालनाट्य स्पर्धा घोषित
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर 22 ऑक्टोबरला राज्यातील नाट्यगृह Theater सुरू करण्यात आली. याआधी मधला काही दिवसांचा अपवाद सोडल्यास दीड वर्ष रंगभूमी प्रयोगांविना सुन्नी होती. परंतु नाट्यगृहांवरील बंदी उठल्यानंतर मरगळ झटकून कलाकार, नाट्यसंस्था उत्साहाने कामाला लागल्या आहेत. याच उत्साहात आता आणखी भर पडली आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने Directorate of Cultural Affairs of the State Government येत्या 1 जानेवारी, 2022 पासून 60 वी मराठी हौशी राज्य नाटय स्पर्धा तर 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्य बालनाट्य स्पर्धा Children's Drama Competition घेण्याचे निश्चित केले आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे.

स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था, शाळा, विद्यालयांकडून दि.30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका मागवण्यात येत आहेत. यावेळी 18 व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 फेब्रुवारी, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय दिव्यांग बालनाटय स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2022 मध्ये एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या राज्यातील नाटय संस्थांनी दिव्यांग बालनाटय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

दरम्यान, गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणार्‍या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना व गतवर्षी बालनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी प्रवेशिका व नियम शासनाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी अनामत

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बालनाट्य व दिव्यांग बालनाटय स्पर्धक संस्थांना एक हजार तर 60 व्या मराठी हौशी नाट्य स्पर्धेसाठी तीन हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा डीडी संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा डीडी संस्थांना परत करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या नियम-अटी

* मुदतीनंतर प्राप्त होणार्‍या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत.

* प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल.

* स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल.

* नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com