Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रलहान मुलांच्या लसीची महत्वाची बातमी

लहान मुलांच्या लसीची महत्वाची बातमी

नागपूर:

नागपुरात लहान मुलांच्या लसींच्या क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून सुरुवात झाली. या टप्प्यात ६ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर लसींची चाचणी केली. यासाठी ३५ मुलांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. लसींच्या चाचणीपूर्वी या सर्व बालकांची ब्लड टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोव्हॅक्सीनवर राजकारण : गायीच्या बछड्याचा आरोपानंतर भाजप आक्रमक

भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सीन लसींच्या क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात बारा ते अठरा वर्षे वयोगटातील ४१ मुलांची निवड करण्यात आली होती. या सर्व मुलांना लस घेतल्यानंतर कुठलेही साईड इफेक्ट दिसून आलेले नाही. यामुळे २८ दिवसानंतर त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुलांना लसीची मात्रा दिल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने नवी दिल्लीतील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल सकारात्मक आल्याने बुधवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनच्या लसीचा पहिला डोस दिला गेला.

देशात चार ठिकाणी चाचणी

देशात एकूण चार ठिकाणी ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची क्लिनिकल ट्रायल होत आहे. त्यामध्ये एम्स दिल्ली, एम्स पटना, नीलोफर हॉस्पिटल हैदराबाद आणि नागपुरातील मेडिट्रीना हॉस्पिटल यांची क्लिनिकल ट्रायलसाठी निवड करण्यात आली आहे. नागपूर शहरात लहान मुलांवर होणाऱ्या क्लिनीकल ट्रायल बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यासाठी सुरुवातीला स्टडी सॅम्पल्स देखील घेण्यात आले आहेत.

तीन टप्प्यात चाचणी

लहान मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल घेण्यासाठी ३ टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात २ ते ६ वयोगट, दुसरा टप्पा ६ ते १२ वयोगट तर तिसरा टप्पा १२ ते १८ वयोगटातील आहे. आयसीएमआरमधील ऑपरेशन ग्रुप फॉर कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले, हे ट्रायल पूर्ण व्हायलला जवळपास चार ते साडेचार महिने लागतील. चाचणीचा परिणाम ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत येण्याची आशा आहे.

ट्रायलचे परिणाम आल्यानंतर काही दिवसांतच लहान मुलांचं लसीकरण सुरू केलं जाऊ शकतं. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण नोव्हेंबर २०२०१ पर्यंत सुरू होण्याची आशा आहे. जर काही कारणामुळे यामध्ये उशीर झाला तर जानेवारी २०२२ पासून लहान मुलांचं पूर्णपणे लसीकरण होणार आहे.

आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या