मी लिखापट्टीवाला मुख्यमंत्री नाही; सरळ कलेक्टरला फोन करायचा अन्...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पहिले भाषण; कुठे फटकारे, कुठे विनोद तर सोडले अनेक तीर
मी लिखापट्टीवाला मुख्यमंत्री नाही; सरळ कलेक्टरला फोन करायचा अन्...

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मी लिखापट्टीवाला मुख्यमंत्री नाही, एखादा विषय समोर आल्यास सरळ कलेक्टरला फोन करून अहवाल आणि काय करून मोकळे असे आपले काम राहणार आहे. हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही. मागील सरकारचे अध्यादेश पूर्णपणे रद्द केले जाणार नाहीत. ज्या अध्यादेशात काही चुकीचे असेल ते आम्ही रद्द करू असे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....(Chief Minister Eknath Shinde)

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे आजच्या विशेष अधिवेशनात संबोधित करत होते. ते म्हणाले की, अजित पवार म्हणाले होते पुढच्यावेळी बंडखोर आमदार निवडून येणार नाहीत. मात्र, आम्ही शिवसेना (Shivsena) सोडलेली नाही. भाजपासोबत (BJP) आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत २०० आमदार निवडून आणू. अजित पवारांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी मी काही बोललो नसल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

अनेक आमदार यायचे आणि म्हणायचे आपली नैसर्गिक युती भाजपासोबत आहे. यानंतर मी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. याला दीपक केसरकर साक्षीदार आहेत. मात्र, याचा परिणाम झाला नाही.

एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरवशावर चाळीस आमदारांनी सगळे पणाला लावले. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितले की, पुढे काय व्हायचे ते होवो, तुमचे नुकसान होत आहे असे वाटले तर मी तुमचे नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन.

ही छोटी मोठी घटना नाही. जे ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत सदस्यही इकडे तिकडे हलू देत नाही. पण हे एवढे मोठे का झाले, काय घडले, कशासाठी झाले? २०-२५ वर्ष एकनाथ शिंदेने रक्ताचे पाणी केले आहे. मी १७ वर्षांचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो.

एका प्रकरणामध्ये मी आनंद दिघेंच्या (Aanad dighe) संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण सिनियर होते. त्यांना बोललो की यांना करा, तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, “मला शिकवतो का?”

सुनिल प्रभु (Sunil prabhu) यांना माहिती आहे माझे कशाप्रकारे खच्चीकरण झाले आहे. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही.

मी मतदानाच्या दिवशी निघून आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांनी सांगितलेले आठवले की, अन्यायाविरोधात बंड पुकारले पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असे म्हणाला नाही. हा विश्वास आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केले तेव्हा कोणी विचारले नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही.” असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com