Saturday, May 11, 2024
Homeजळगावमुख्यमंत्री पाळधीत गरजले : पुढल्या काळात समोरचे औषधालाही उरणार नाही

मुख्यमंत्री पाळधीत गरजले : पुढल्या काळात समोरचे औषधालाही उरणार नाही

जळगाव jalgaon

राज्यात गेल्या अडीच वर्षात (two and a half years) जी कामे झाली नाहीत (Work is not done) ती अडीच महिन्यात (two and a half months) झालेली आहे. आमदार खासदार (MLA MP) देखील खुश (happy) आहेत. राज्यात नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Elections) निकाल (result) लागले. या निवडणुकीत खऱ्या शिवसेना भाजपा युतीला (Real Shiv Sena to BJP alliance) मिळालेले यश हा सत्तांतराला मिळालेला (success achieved) कौल आहे. दरम्यान अडीच महिन्यात एवढी कामे झाली आहेत तर अडीच वर्षात आणखी किती होतील ? पुढल्या काळात समोरचे (In the future, the front)औषधालाही उरणार (Medicine will not help) नाही असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिला.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण आणि 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे शुभारंभ करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, नामदार अब्दुल सत्तार, नामदार उदय सामंत, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, खासदार उन्मेश पाटील, आमदार चंदुलाल पटेल हे उपस्थित होते.

पाळधी येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत शिंदे साहेब आगे बढो अशी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री शिंदे व्यासपीठावर आल्यानंतर हात उंचाउन त्यांनी जनतेला अभिवादन केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होते. जनतेचे एवढे प्रेम आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता की नाही ? असा प्रश्न विचारताच खाली बसलेल्या जनतेने योग्यच होता असा प्रतिसाद दिला.

शिंदे पुढे म्हणाले की गेल्या अडीच वर्षात त्यांनी सगळ्यांना घरात बसविण्याचे काम केले. मात्र आम्ही अडीच महिन्यात एवढे काम केले की ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळाले. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असे सांगत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावाला.

निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी झाली. आम्ही सांगत होतो राष्ट्रवादी सेनेला गिळायला निघालेली आहे. असच सुरि राहिले तर हाताच्या बोटावर मोजायलाही शिवसेना राहणार नाही. गुलाबराव पाटील अनेकदा माझ्याकडे येऊन सांगायचे की चला आपण उद्धव साहेबांना सांगू पण मी पाच वेळा त्यांना सांगितले.

मात्र जो झोपेचे सोंग घेतो त्याला कसे जागी करणार? त्यामुळे त्यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त केली. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडणूक लढविली. सोनिया गांधी आणि शरद पवारांविरुद्ध ही ही निवडणूक होती.

जनतेने शिवसेना-भाजप युतीला कौल दिला होता. मात्र परिस्थिती वेगळीच निर्माण झाली. पण आम्ही आता जे केलंय ते बरोबर केले की नाही ? असा प्रश्न विचारताच खाली बसलेल्या जनतेने बरोबर केले आहे असा प्रतिसाद दिला.

श्रेय मिळू नये म्हणून गुलाबरावांचे भाषण थांबवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी गुलाबरावचा फॅन आहे. गुलाबराव पाटील हे सेनेचे बुलंद तोफ आहे. ठाण्यात निवडणुकी वेळी भाषणासाठी मी नेहमीच त्यांना बोलवतो. शिवाजी पार्कवरचं त्यांचं भाषण हे कार्यकर्त्यांसाठी चेतना देणारे असते. पण केवळ गुलाबराव पाटील यांना क्रेडिट मिळू नये म्हणून त्यांचा शिवाजी पार्क भाषण बंद केलं गेलं. मी मात्र कद्रू मनाचा नाही. गुलाबरावच्या जिभेवर सरस्वती बसली आहे. तो त्यांचा गुन्हा आहे का? पण गुलाबराव आता टेन्शन घेऊ नका, हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या