आता गोविंदांना सरकारी नोकरी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आता गोविंदांना सरकारी नोकरी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत (Vidhansabha) मोठी घोषणा केली. दहीहंडीच्या (Dahi handi) उत्साहात सहभागी होणारे गोविंदा (Govinda) जखमी झाले तर त्यांना विमा (Insurance) मिळणार आहे...

तसेच या उत्साहाचे क्रीडा प्रकारात समावेश करुन गोविंदांना शासकीय नोकरीत पाच टक्क्यांच्या कोट्यातून नोकरीचा लाभ घेता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे.

तसेच दहीहंडी (Dahi Handi) उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे, असेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

आता गोविंदांना सरकारी नोकरी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
दुचाकीची उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरदार धडक; दोन तरुण पडले २५ फूट खाली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विमा संदर्भात भाष्य केले होते. दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

तसेच जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये आणि हात-पाय मोडला किंवा फॅक्चर झाला तर पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात सामावेश करायचा आहे. याबाबत सर्वच गोविंदांची मागणी होती. त्यामुळे गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा राबवाव्यात. राज्य शासनाकडून या स्पर्धा चालू केल्यानंतर बक्षीसे हे राज्य शासनाकडून मिळतील.

त्याचप्रमाणे इतर खेळांप्राणे या खेळातील गोविंदांना देखील शासकीय नोकरीत पाच टक्क्यांच्या कोठ्यातून लाभ मिळेल. तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

या आहेत अटी शर्ती

  • दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे.

  • न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे.

  • गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी.

  • पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे.

  • मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

  • गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

  • मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे.

  • मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com