मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

औरंगाबाद । वृत्तसंस्था Aurangabad

भाजपच्या (BJP ) नेत्यांमुळे देशाची जगभर नाचक्की झाली आहे, त्यामुळे सरकारला माफी मागावी लागली हे दुर्दैवी असून देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला जातो हे योग्य वाटते का असा सवाल विचारत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray)यांनी भाजपवर घणाघात केला.औरंगाबादमधील ( Aurangabad )मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,अडीच वर्षे झाल्यानंतरही हे सरकार कोसळत नाही, त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाल्याची टीका ठाकरे यांनी केली. ठाकरे म्हणाले की, गेली 25 वर्षे जे मांडीवर बसले होते, ते आता उरावर बसले आहेत. तर ज्यांच्याशी 25 वर्षे लढलो, त्यांनी मानसन्मान दिला. आता रोज सरकार पडण्याची हे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळेच मी परत येणार अशी वक्तव्य केली जातात.

भाजप सुपारी देऊन भोंगा वाजवते, हनुमान चालीसा पठण करुन घेते.हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे म्हणून ही जनता माझ्यावर प्रेम करतेय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा असे बाळासाहेब म्हणाले होते.

त्याचसोबत आज सगळं काही ठीक असताना भाजपा कुणालातरी सुपारी देते, हनुमान चालीसा पुढे आणते, भोंगा आणते, थडग्यावर नतमस्तक व्हायला लावते. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, जर कुणी धर्माचे वेड घेत असेल तर आम्ही देशाभिमानी हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. दुसर्‍या धर्माचा द्वेष आम्ही करत नाही असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com