Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीच्या निर्देशां नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्रीपद व विधानपरिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी बोलतांना सांगितले की मला आज अभिमान आहे की मी मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. माझ्या सोबत असलेल्यानीच माझा घात केला; आणि आयुष्य भर ज्यांना विरोध केला त्यांनीच मला शेवट पर्यंत साथ दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्ष यांनी नेहमीच मुख्यमंत्री पदावर असताना साथ दिली.

मी कधीही जाहीर केले नव्हते की मी येणार, येणार होतो असे काहीही नसताना मी महाविकास आघाडी सरकार कडून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो. मुख्यमंत्री पद सोडताना मला थोडेसे ही दुख होत नसून माझ्या आपल्यांनी दिलेल्या दु:खाने मी निर्णय घेत आहे.

दरम्यान, सर्व शिव सैनिकांना उद्धव ठाकरे यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या