Monday, April 29, 2024
HomeनाशिकVideo : अकादमी कुठलीही असो, पाहुणा मात्र मुंबईचा लागतो - मुख्यमंत्री उद्धव...

Video : अकादमी कुठलीही असो, पाहुणा मात्र मुंबईचा लागतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये (Nashik Trimbak Road Maharashtra police academy) केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी झाले. याप्रसंगी संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, हा पहिला कार्यक्रम असा आहे जिथे मी मास्क काढून बोलत आहे…

- Advertisement -

करोनाचे सावट इथे गडद होते मात्र उत्तम नियोजन आणि प्रशासनाच्या मेहनतीने आज इथून करोना रोखण्यास चांगले यश आले. याकाळात पोलिसांचे उल्लेखनीय काम दिसून आले. पोलिसांनो तुम्ही जनतेचे रक्षक आहात तुम्ही सांगा काय पाहिजे ते तुम्हाला उपलब्ध करून देतो.

अकादमी नाशिकची असो किंवा पुण्याची पाहुणा मात्र मुंबईचा लागतो असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सर्वत्र हशा पिकला होता.

मुख्यमंत्र्यांचे पोलीस अकादमीत आगमन; अर्धा डझन मंत्र्यांची उपस्थितीप्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत आज निर्णय होणार?

प्रारंभी, मुख्यमंत्र्यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. याप्रसंगी अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अकादमीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी परिसरातील नवनिर्मित इनडोअर कंपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक, अस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टॉपिंग बास्केटबॉल व व्हॉलिबॉल मैदान तसेच निसर्ग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मान्यवरांसह या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.

Video : पोलीस आयुक्तालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

- Advertisment -

ताज्या बातम्या