शिवराजसिंह  चाैहान
शिवराजसिंह चाैहान|राजकीय
मुख्य बातम्या

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कराेना पाॅझिटिव्ह

कराेना झालेले शिवराजसिंह देशातील पहिले मुख्यमंत्री

jitendra zavar

jitendra zavar

भाेपाळ। Bhopal

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chauhan) कराेना पाॅझिटिव्ह झाले आहेत. कराेना पाॅझिटिव्ह झालेले ते देशातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. स्वत: टि्वट करुन त्यांनी आपण कराेना पाॅझिटिव्ह असल्याची माहिती दिली. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या लाेकांनी कराेनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

चाैहान यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, COVID-19 च्या सर्व गाइडलाइंसचे मी पालन करत आहे. स्वत:ला क्वारटाइन केले आहे. राज्यातील जनतेने सावधगिरी बाळगावी. दक्षता न बाळगल्यास आपण कराेनाला आमंत्रण देताे. मी कराेनापासून वाचण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. परंतु समस्या घेऊन येणाऱ्या लाेकांना मी भेटत राहिलाे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कराेना चाचणी करुन घ्यावी.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com