Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजोडे पुसणारे विश्वासघातकी नसतात!; मुख्यमंत्री शिंदे यांचा पलटवार

जोडे पुसणारे विश्वासघातकी नसतात!; मुख्यमंत्री शिंदे यांचा पलटवार

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

जोडे पुसणारे गरीब असतील, पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही (Leadership) करू शकतात. हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते.

- Advertisement -

वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलताना फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोक राज्य करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर नाव न घेता केली होती. या टीकेला शिंदे यांनी आज ट्विट करून प्रत्युत्तर दिले.

काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

भीषण अपघात; मनमाड-मालेगाव महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस पलटी

- Advertisment -

ताज्या बातम्या