Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्‍लीत

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्‍लीत

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister EKnath Shinde )आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) हे आज, शुक्रवारी दिल्‍लीला ( Delhi) जाणार आहेत. मावळते राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्‍या कार्यक्रमाला उपस्‍थित राहण्यासाठी दोघेजण जात असले तरी मंत्रीमंडळ विस्‍ताराच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या दिल्‍ली भेटीला महत्‍व आले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आज अधिकृत दिल्‍ली दौरा आहे. विशेष म्‍हणजे फडणवीस यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. मावळते राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ दिल्‍लीत स्‍नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशातील सर्व राज्‍यांचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण आहे.त्‍यासाठी शिंदे, फडणवीस दिल्‍लीला जात आहेत.

परंतु, दोघांच्या दिल्‍ली भेटीला राजकीय महत्‍वही आहे. शिंदे यांनी ३० जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्‍तार झालेला आहे. न्यायालयातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी हे यामागचे मोठे कारण असल्‍याचे मानण्यात येत आहे.

मात्र आता याबाबत काहीतरी निर्णय घ्‍यावाच लागणार आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या दिल्‍ली भेटीत या मुद्द्यावर भाजप श्रेष्ठींशी चर्चा होउ शकते. शनिवारी, २३ जुलै रोजी भाजपच्या राज्‍य कार्यकारिणीची पनवेल येथे बैठक होत आहे. तर २५ जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्द्ल अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या