मुख्यमंत्र्यांचा आज डॉक्टरांशी संवाद

 मुख्यमंत्र्यांचा आज डॉक्टरांशी संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई|प्रतिनिधी

करोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री आज, रविवारी दुपारी १२ वाजता राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत.

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. याच्या पुढील टप्प्यात आज दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मिडीयावर एका विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलतील. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.


उद्धव ठाकरे यांच्या सोशल मिडियावरून या संवादाचे प्रसारण करण्यात येईल. या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टर्सनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

कार्यक्रम कुठे आणि किती वाजता


हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक https://www.facebook.com/100441008205176/posts/304013491181259/

आणि यूट्यूब चॅनेलवर https://youtu.be/7dH0X0FTCpc

आज रविवारी दुपारी १२ वाजता पहायला मिळेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com