Thursday, April 25, 2024
Homeजळगावमुख्यमंत्री आज जळगाव जिल्ह्यात

मुख्यमंत्री आज जळगाव जिल्ह्यात

जळगाव jalgaon ।

राज्यातील सत्तांतरात (transition of power in the state) जळगाव जिल्ह्यातील आमदारांची (MLAs) मोठी ताकद मिळाली होती. तेव्हापासून शिंदे गटाचे (Shinde group) आमदार टीकेचे धनी होत आहेत. दरम्यान या आमदारांना ताकद (give strength) देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) उद्या दि. 20 रोजी जिल्हा दौर्‍यावर (district tour) येत आहेत. शिंदेच्या या दौर्‍याकडे ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लताताई सोनवणे आणि आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले. या पाचही आमदारांनी राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आणण्यात मोठी मोलाची भूमिका बजावली होती. शिवसेनेशी बंडखोरी केली म्हणून जिल्ह्यातील ठाकरे गटातर्फे या आमदारांविरोधात आक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. ठाकरे गटाकडून संधी मिळेल तेव्हा या आमदारांवर टीका केली जात आहे. या टीकेला तितकेच प्रतिउत्तरही शिंदे गटाच्या आमदारांकडून दिले जात आहे. दरम्यान या आमदारांना ताकद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दि. 20 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याकडे लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्ताईनगर मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. गेल्या 35 वर्षापासून मुक्ताईनगर हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात भाजपाला मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे मात्र आता राष्ट्रवादीत असल्याने त्यांच्या मतदारसंघात होणार्‍या या सभेकडे शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि भाजपाचे लक्ष लागले आहे.

असा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या 20 रोजी दुपारी 3.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन होणार असून ते मोटारीने पाळधीकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी 4.00 वा. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सायं. 5.30 वा. मुख्यमंत्री शिंदे यांचे मुक्ताईनगर येथे आगमन होणार असून त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर रात्री सोईनुसार शासकीय विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या