नाशिक मनपाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांंनी दिले 'हे' आदेश

नाशिक मनपाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांंनी दिले 'हे' आदेश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महापालिका ( NMC ) कार्यक्षेत्रातील मोकळ्या भूखंडांचा ( Plots )वापर धर्मादाय संस्थांमार्फत ना नफा तत्वावरील समाजपयोगी उपक्रमासाठी होत असतो. अशा संस्थांना भूखंडासाठी पूर्वीप्रमाणे नाममात्र शुल्क आकारणीसाठी नियमात आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांनी दिले.

नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विषयांबाबत आज (दि. 22) मुंबईत मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश दिले. नाशिकचे खा. हेमंत गोडसे, आ. प्रताप सरनाईक, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुंडे आदि उपस्थित होते. तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १०७५ भूखंडावर स्वंयसेवी आणि धर्मादाय संस्थांच्या मार्फत वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, अभ्यासिका, व्यायामशाळा यासारखे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. भूखंडासाठी भाडे आकारणीचा नियम बदलल्याने या संस्थांना आर्थिक अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी संबधित भूखंड वापरासाठी पूर्वीप्रमाणे नाममात्र भाडे आकारण्यात यावे, यासाठी नियमात सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. या सुधारणेचा फायदा राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील समाज उपयोगी उपक्रमांना होणार आहे.

फ्री होल्ड साठी शासन सकारात्मक

नाशिक मधील सिडकोचा शहर विकासाचा उद्देश पूर्ण झाल्याने त्या क्षेत्रातील जमिनी फ्री होल्ड करण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावित किकवी धरणाच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

या बैठकीत नाशिक महापालिका क्षेत्रातील ऑनलाईन बांधकाम परवानगी प्रणाली, रिक्त पदांची भरती, प्रस्तावित रिंग रोड यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com