Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री थोड्याचवेळात नाशकात

मुख्यमंत्री थोड्याचवेळात नाशकात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज पहाटे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे…

- Advertisement -

नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे. मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

नाशकात मृत्यूचं तांडव! अपघातानंतर बसने घेतला पेट, दुर्घटनेचा भयावह व्हिडीओ आला समोर

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. अपघात झालेल्या स्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत. तसेच अपघातात जखमी झालेल्यांचीदेखील मुख्यमंत्री भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

मोठी दुर्घटना! नाशकात प्रवासी बस जळून खाक, १० जणांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या