Video : गणेशोत्सवासह इतर सण उत्सव जल्लोषात साजरा होणार : मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

गेली दोन वर्षे करोना काळामुळे सण उत्सव साजरी करण्यात आले नाहीत. त्यामुळे यंदा करोना आकडा कमी झाला असून सण उत्सव जल्लोषात साजरी करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. याप्रसंगी ते बोलत होते....

ते म्हणाले की, यंदा सर्व सण उत्सव जल्लोषात साजरी केली जाणार आहेत. करोनाचे निर्बंध या सण उत्सवांना नसणार आहेत. केवळ केंद्र सरकारने करोनाच्या बाबतीत घालून दिलेल्या नियमांचे पालन होणार आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, गोविंदा यांच्यावरील निर्बंध, तसेच मोहोरम यावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत.

आरे कारशेडसाठी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल दिला असतानाही उद्धव ठाकरे सरकारने केवळ आकसापोटी हा निर्णय घेतल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आरे कारशेड झाल्यानंतर येथून निघणाऱ्या मेट्रोमधून सतरा लाख प्रवासी प्रवास करणार असल्याचे मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे कारशेड मुळे मिठी नदीला पूर येऊ शकतो असे म्हटले होते. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर मिठी नदी आणि मुंबईकरांची इतकी चिंता होती तर मिठी नदीवर झालेले अतिक्रमण का रोखले गेले नाही असाही सवाल याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य यांनी विचारला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com