आमदार सुहास कांदेंची तक्रार अन् शिंदेंचा भुजबळांना दणका; सहाशे कोटींच्या कामांना ब्रेक

आमदार सुहास कांदेंची तक्रार अन् शिंदेंचा भुजबळांना दणका; सहाशे कोटींच्या कामांना ब्रेक

नाशिक | प्रातिनिधी Nashik

राज्यातील नाट्यमय घडामोडींच्या नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas aghadi government) कोसळले. शिवसेनेच्या ३९ बंडखोर आमदारांच्या पाठींब्यावर भाजपने सरकार (BJP government) स्थापन केले. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना मुख्यमंत्री पद दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात कालपासून (दि ०१) काम सुरु केले आहे. शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या ५६७ कोटींच्या कामांना ब्रेक दिला आहे...

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadanvis) यांनीही नुकताच मंत्रालयातील कामाचा आढावा घेतला असून बंद असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश त्यांच्याकडून देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्याच दिवशी माजी मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दणका दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) ५६७ कोटींच्या कामांना घाईघाईने मंजूरी कशासाठी दिली, असा प्रश्न नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजनच्या बैठकीत ५६७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. तसेच निधीचे आमदारांमध्ये समसमान वाटप करण्यात आले होते. यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळ नांदगाव तालुक्याला निधी देण्यात भेदभाव करतात असा आरोपदेखील केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com