Video : कुठे आहेत आमचे कांदे? म्हणताच छगन भुजबळांनी लावला डोक्याला हात; सभागृहात पिकला हशा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नांदगावचे शिवसेना बंडखोर आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) आणि तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister Chhagan bhubal) यांच्यात भर सभेत निधी वाटपावरून तु-तू मै-मै झाली होती. यावरून कांदे भुजबळ वादाची ठिणगी पडली होती. तेव्हापासून दोघांमध्ये नियमित कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद होत होते. अशातच आता शिंदे सरकार स्थापन झाल्यामुळे कांदेंचे वजन वाढले आहे तर भुजबळ हे विरोधी पक्षात बसणार आहेत....

आज विश्वास दर्शक ठराव भाजप (BJP) आणि शिवसेना बंडखोरांच्या शिंदे गटाने जिंकत सर्वांनाच धक्का दिला. यानंतर सभागृहात मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांची भाषणे झाली. सर्वाधिक गाजले ते राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे भाषण. शिंदे यांनी सुरत मार्गे गुवाहाटी प्रवास आणि तिथले अनुभव सभागृहात सांगितले. अनेक वेगवेगळे किस्से सांगत सभागृह लोटपोट झाले होते.

आम्ही शिवसेना सोडलेली नसल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारातील काही किस्से सांगत यावेळी स्पष्ट शब्दांत अनेक गोष्टी सांगितल्या. दिवंगत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsenapramukh Balasaheb Thackeray) यांचे कॉंग्रेस राष्ट्रवादीबद्दलचे (Congress and NCP) विचार यावेळी त्यांनी कथन केले. ही युती बाळासाहेबांच्या विचारांची युती असल्याचे शिंदे याप्रसंगी म्हणाले.

याच वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे सहकारी नांदगावचे आमदार सुहास कांदे (Nandgaon Mla Suhas Kande) यांचा उल्लेख करत आमचे कांदे कुठे आहेत? असे म्हटले. यावर सभागृहात हशा तर पिकलाच शिवाय छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी डोक्याला हातदेखील लावला. यामूळे आणखीनच सभागृह लोटपोट झाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, भुजबळ साहेब आमचे जुने सहकारी आहेत. आपल्याला कांदेंना सांभाळायचे आहे असे सांगत पुन्हा एकदा सभागृहाला हसवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com