
नाशिक | प्रतिनिधी Nashik
फडणवीस शिंदे सरकारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मालेगाव बाह्य आणि नांदगाव मतदार संघात त्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. एकीकडे शिंदे गटाला जाऊन मिळालेल्या आमदार दादाजी भुसे आणि सुहास कांदे यांच्याकडून सत्काराचे आयोजन केलेले असताना नाशिकमधील शिवसैनिकांनी मात्र या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे....
या शिवसैनिकांचा विरोध मावळणार की, यादिवशी शिवसैनिक मुख्यमंत्र्यांना घेरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर मुख्यमंत्री मालेगावी येणार असल्यामुळे जय्यत तयारी मालेगावसह नांदगाव मतदार संघात सुरु झाली आहे. मालेगाव जिल्हानिर्मितीला नवनिर्वाचित मुख्यमंत्री बुस्ट देणार का याकडेही नागरिकांचे लक्ष लागून आहे.
असा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा
दि. २९ जुलै २०२२ रोजी सायं. चार वाजता नंदनवन शासकीय निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथून मोटारीने ठाणे शहापूर इगतपूरी (घोटी)- नाशिक मार्गे मालेगावकडे मुख्यमंत्री प्रयाण करतील.
मालेगाव शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे रात्री दहाच्या सुमारास आगमन होईल. मालेगावी ते मुक्काम करतील. यानंतर शनिवार (दि. ३०) रोजी सकाळी १० वाजता ते पाऊस, अतिवृष्टी पिक- पाणी व विकास कामे विभागीय आढावा घेतली.
सकाळी ११.३० वा मालेगावातील क्रिडा संकुलात नाशिक ग्रामीण घटकातील नविन शासकीय निवास्थान प्रकल्प प्रशासकीय इमारतीचे स्थळ:- गट नं. ६३६, गट नं. ७२९/९/ गट नं. ३०/१, मालेगाव लोकार्पण ते करणार आहेत.
यानंतर १) बोरी-आंबेदरी व दहिकुटे कालवा (बंदिस्त पाईपलाईन टाकणे) (२) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत काष्टी, ता. मालेगांव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुल बांधणे ३) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन ४) जल जिवन मिशन-दाभाडी १२ गांव, माळमाथा २५ गांव. २६ गांव पा.पु. योजना, चंदनपुरी व ३२ गावांच्या वैयक्तीक पा.पु. योजना यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
यानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्रकार परिषद होणर आहे. यानंतर मालेगावी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शिवसेना पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पोलीस मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे मालेगाव येथून मोटारीने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरकडे प्रयाण करतील. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मनमाड चौफुली येथील कार्यालयास ते भेट देतील.
तसेच त्यांचा स्वागत सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार सुहास कांदे व सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तर यांच्या हस्ते येवला चौफुलीजवळ होणार आहे. यानंतर त्यांचा वैजापूरमध्ये मुक्काम असेल अशी माहिती देण्यात आली आहे.