नाशिक-औरंगाबाद रोडवर छोटा हत्ती-स्कूल बसची जोरदार धडक; दोन गंभीर

नाशिक-औरंगाबाद रोडवर छोटा हत्ती-स्कूल बसची जोरदार धडक; दोन गंभीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावर (Nashik Aurangabad Highway) छोटा हत्ती आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात (Accident) दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सुदैवानं शाळकरी विद्यार्थी सुखरूप आहेत....

याबाबत अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यातील (Yeola Taluka) ममदापूर येथून संतोष लहानू लांडगे हा शेतकरी आपला कांदा एमएच १५ सीके ८९२० या छोटा हत्तीतून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार असलेल्या विंचूर येथे विक्रीसाठी घेऊन येत होता.

तसेच एस. एन. डी. महाविद्यालयाची एमएच १५ एके ९०२ ही स्कूल बस येवल्याच्या दिशेने जात होती. यावेळी नाशिक-औरंगाबाद मार्गावर काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग तर काही ठिकाणी साईट पट्ट्या मारण्याचे काम सुरू आहे.

नाशिक-औरंगाबाद रोडवर छोटा हत्ती-स्कूल बसची जोरदार धडक; दोन गंभीर
मविप्र निवडणूक : आमदार माणिकराव कोकाटेंची माघार

यामुळे येवला तालुक्यातील देशमाने शिवारात एकेरी वाहतूक वळवण्यात आली होती. याबाबत वाहनचालकांना माहिती नसल्याने कांद्याने भरलेला छोटा हत्ती आणि स्कूल बस समोरासमोर येऊन त्यांच्यात जोरदार धडक झाली.

नाशिक-औरंगाबाद रोडवर छोटा हत्ती-स्कूल बसची जोरदार धडक; दोन गंभीर
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? ईडी तपासात 'ही' धक्कादायक माहिती उघड

या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने स्कूल बसमधील चालकासह विद्यार्थी सुखरूप आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com