व्वा रे पठ्ठ्या! एक लाखाच्या मोबाईलसाठी त्याने तलाव केला रिकामा

अधिकाऱ्याच्या प्रतापाने संतापाची लाट
व्वा रे पठ्ठ्या! एक लाखाच्या मोबाईलसाठी त्याने तलाव केला रिकामा

दिल्ली | Delhi

आजकाल तर हा मोबाइल म्हणजे मुलभूत गरजच झाली आहे. आपला मोबाइल सर्वांनाच प्रिय असतो. मोबाइल नंबरपासून ते अनेक महत्त्वाच्या गोष्टी या मोबाइलमध्ये असतात. जर तोच मोबाइल हरवला तर आपण तो शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करतो.

पण जेव्हा तुम्ही एका सरकारी पदावर असता तेव्हा मात्र तुमच्या प्राथमिकता बदलतात. तेव्हा तुम्ही अनेक निर्णय घेताना आधी जनतेचा आणि नंतर स्वत:चा विचार करणं अपेक्षित असतं. पण छत्तीसगडमध्ये एका अधिकाऱ्याने आपला हरवलेला मोबाइल शोधण्यासाठी शेतीसाठी लागणारं तब्बल २१ लाख लीटर पाणी उपसून बाहेर काढल्याची अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर या अधिकाऱ्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राजेश बिश्वास असे या अधिकान्याचे नाव असून कांकेर जिल्ह्यात ते अन्न निरीक्षक म्हणून काम पाहतात.

व्वा रे पठ्ठ्या! एक लाखाच्या मोबाईलसाठी त्याने तलाव केला रिकामा
ATM फोडले, रकमेसह मशीनही चोरून नेले, पण....

खेरका या छोट्या धरणावर सहलीसाठी आलेल्या बिस्वास यांचा एक लाख रुपयांचा महागडा मोबाईल पाण्यात पडला. १५ फूट खोल पाण्यात पडलेला हा मोबाईल काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनाही कामाला लावण्यात आले. त्यांनी ३० एचपीचे दोन डिझेल पंप मागवून धरणातील सारे २१ लाख लिटर पाणी उपसून टाकले. एक मोबाईल बाहेर काढण्यासाठी १५०० एकर शेतीला पुरेल एवढे पाणी बाहेर काढले गेले.

दरम्यान, फोन जलाशयातून बाहेर काढण्यासाठी लाखो लीटर पाणी उपलसे, याची सगळीकडे चर्चा झाली.याबाबत भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीका केली. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भूपेश बघेल यांच्या हुकूमशाहीत अधिकारी राज्याला वडिलोपार्जित जायजाद समजत आहेत. कडाक्याच्या उन्हात नागरिक टँकरवर अवलंबून आहेत, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. तर अधिकारी आपल्या मोबाईलसाठी २१ लाख लिटर पाणी वाया घालवत आहेत. यामध्ये दीड हजार एकर जमीन सिंचनाखाली येऊ शकते, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.

व्वा रे पठ्ठ्या! एक लाखाच्या मोबाईलसाठी त्याने तलाव केला रिकामा
Monsoon Update : यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत कांकेर जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न निरीक्षकाला निलंबित केले आहे. मात्र यात आपली अजिबात चूक नसल्याचा दावा राजेशने केला आहे. मोबाईलमध्ये कार्यालयाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे असल्याने तो पाण्यातून काढावा लागल्याचे राजेशने सांगितले. त्यामुळे पाणी बाहेर काढण्यात आले. वरिष्ठांच्या परवानगीने जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्याचा दावाही राजेशने केला आहे. हे पाणी शेती आणि पिण्यासाठी योग्य नसल्याचे उत्तर राजेशने दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com