Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिवरायांची वाघनखे ब्रिटनमधून परत आणणार - मुनगंटीवार

शिवरायांची वाघनखे ब्रिटनमधून परत आणणार – मुनगंटीवार

मुंबई | Mumbai

जगदंबा तलवार (Jagadamba sword) पाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी वापरलेली वाघनखे (tiger claws) राज्यात परत आणणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, शिवरायांनी वापरलेले वाघ नखं पुन्हा मिळावेत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्याशी चर्चा सुरू असून शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी (Coronation ceremony) वाघ नखं राज्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवरायांनी वापरलेली ही वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये असून याआधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाला २०२४ साली ३५० वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच ६ जून २०२४ हा संकल्प आणि शपथ दिवस असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या