…तर गाठ माझ्याशी आहे - छत्रपती संभाजीराजे

…तर गाठ माझ्याशी आहे - छत्रपती संभाजीराजे

मुंबई | Mumbai

ऐतिहासिक चित्रपटातून (Historical Film) इतिहासाचा विपर्यास होत असल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी केला आहे. तसेच त्यांनी अभिनेता सुबोध भावेची (Actor Subodh Bhave) मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’(Har Har Mahadev)आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटावरही आक्षेप घेतला आहे...

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. असे चित्रपट लोकांसमोर नेले जात आहेत. महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावे आपण काहीही दाखवत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत आहात ही चांगली गोष्ट आहे. परंतु या चित्रपटांच्या माध्यमातून तुम्ही इतिहासाचा विपर्यास करत आहात.

तसेच 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Dauddale Saat) या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले कलाकार हे मावळे आहेत का? हा इतिहासाचा विपर्यास आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar) सिनेमा आहे. त्यातील कलाकारांनी पगडी घातलेली नाही. पगडी काढणे म्हणजे शोक समजला जातो, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मी सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की, जर असेच चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. चित्रपट काढून तर दाखवा, मी आडवा नाही आलो तर बघा. मीच आडवा येणार, अन्यथा या घराण्यात जन्म होऊन काय फायदा आहे. वेळप्रसंगी मला काही झालं तरी चालेल, पण महाराजांचा असा चुकीचा इतिहाससमोर आणत असाल तर याद राखा, असा जाहीर इशारा यावेळी संभाजीराजेंनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com