Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यामेटेंच्या मृत्यूबाबत छत्रपती संभाजीराजेंनी केला 'हा' गंभीर आरोप

मेटेंच्या मृत्यूबाबत छत्रपती संभाजीराजेंनी केला ‘हा’ गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

शिवसंग्रामचे (Shiv Sangram) नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) माडप बोगद्याजवळ अपघाती (Accidental) निधन झाले.

- Advertisement -

त्यांच्या या अकाली निधनाबद्दल विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यातच आता हा अपघात झाल्यानंतर एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहचल्यामुळे या घटनेला केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Government) जबाबादार असल्याचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे.

छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje) म्हणाले की, विनायक मेटे यांना मी श्रद्धांजली वाहतो. सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे.

अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिराने आपत्कालीन मदत (Emergency Assistance)मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, मुंबई-पुणे या मार्गावर रहदारी असते. येथे आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी, अशी मागणी देखील छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या