
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) चिघळा असून आज बेळगावजवळ महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यातील अन्य शहरांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी कर्नाटक सरकारला थेट इशारा दिला आहे...
संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची (Vehicles) कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील (Kolhapur) लाखो भाविक (Devotee) सौंदत्ती येथे गेले असून त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने (Karnataka Government) करावी नाही तर वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकमधील ह्ल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला हे हल्ले थांबवण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेट दिला आहे. तसेच बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र आल्याचेही त्यांनी सांगितले.