...तर खपवून घेतले जाणार नाही - छत्रपती संभाजीराजे

...तर खपवून घेतले जाणार नाही - छत्रपती  संभाजीराजे

मुंबई | Mumbai

'हर हर महादेव' चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) प्रदर्शनानंतर मोठा वाद निर्माण झाला असून चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप शिवप्रेमी संघटनांकडून करण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट टीव्हीवर दाखवू नये अशी भूमिका देखील काही संघटनांकडून घेण्यात आली आहे. त्यानंतर आता या चित्रपटावर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे...

संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’चित्रपटाला विरोध दर्शविला असून विरोध करण्यामागील कारणांचा पुनरुच्चार केला. तसेच इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवण्यास विरोध असून जो इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जातो तोच इतिहास नवी पिढी खरी मानणार. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास (History) दाखवला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

ते म्हणाले की, 'हर हर महादेव' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची (Censor Board) परवानगी मिळाली आहे. मात्र, सेन्सॉर बोर्ड हे दिल्लीत बसले आहे. या बोर्डात नेमके कोण इतिहासकार आहेत माहिती नाही. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांसाठी राज्य सरकारने राज्य पातळीवर इतिहासकारांची समिती नेमावी. चित्रपटांची पहिली स्क्रिनींग महाराष्ट्रात करून पुढे ते सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीसाठी दिल्लीला पाठवावे', असे संभाजीराजे म्हणाले आहेत. तसेच याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com