Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याफोर्ट सर्किट टुरिझम’कडे दुर्लक्ष: छत्रपती संभाजी महाराज

फोर्ट सर्किट टुरिझम’कडे दुर्लक्ष: छत्रपती संभाजी महाराज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात असलेले समुद्री किल्ले (fort) जगात कुठेही पहायला मिळणार नाहीत. त्यामुळे राज्याची राजधानी मुंबई ते शिवरायांची (Shivaray) राजधानी रायगडपर्यंत (Raigad) समुद्र मार्गाने जाणारे ‘फोर्ट सर्किट टुरिझम’ (Fort Circuit Tourism) सुरु करावे, ही मागणी मागील सहा वर्षापासून प्रलंबित आहे. कोणत्याच  सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याची खंत स्वराज्य (swarajya) संघटनेचे प्रमुख माजी खासदार छ.संभाजी महाराज (sambhaji maharaj) यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

येथील डॉ. प्रशांत शिरोडे यांच्या ‘स्वराज्य- शौर्यगाथा तीन पिढ्यांची’ या पुस्तकाच्या प्रकाशन (publication) सोहळ्यात ते बोलत होते. या पुस्तकाची प्रस्तावना छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेली आहे. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) या तीन पिढ्यांच्या शौर्यगाथेचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

सरकारने किल्ले जतन करण्यासाठी आपल्याला ब्रँड ऍम्बसेडर म्हणून नेमले. सरकारने नेमलेल्या समितीत आपणाला घेतले, पण समितीने काही काम केले नाही. किल्ले संवर्धन करण्याचे काम आपणच करतोय, अशी टिकाही संभाजी महाराज यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या