Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याहा तर कानुनी लोचा...; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

हा तर कानुनी लोचा…; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक | Nashik

आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिवसेनेकडून (Shivsena) दाखल करण्यात आलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंना २६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे…

- Advertisement -

यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, न्यायालयाने स्टेटस को नेमका कशावर दिला आहे? आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (disqualification) की मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हे काही लक्षात आले नाही. दोन्ही बाजूंनी मातब्बर विधिज्ञ बाजू लढवत आहेत.

गटनेता (Group leader) कोणी बदलायचा? सदस्यांना अधिकार आहे की नाही? आणि पक्षाच्या बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षातच जायला पाहिजे अशी तरतूद आहे, त्याचे काय झाले? या सर्व प्रश्नांचा न्यायालयाने उहापोह सुरु असून खरं म्हणजे सगळी कायदेशीर गुंतागुंत झाली असून कानुनी लोचा झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, अनेक गोष्टी एकापाठोपाठ एक घडत आहेत. हे सगळं जे घडत आहे ते एका दृष्टीनं देशापुढील इतर सगळ्या राजकारण्यांना, पक्षांना, राज्यांना मार्गदर्शक ठरेल. अशा प्रकारचाच निकाल सर्वोच्च न्यायालयाला घ्यावा लागेल. काही गोष्टींना कोट करावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दोन-तृतीयांश सदस्यांना निघून जायचे असेल तर त्याचा नेमका अर्थ काय? असेही न्यायाधीशांनी विचारले असून असे अनेक प्रश्न न्यायालयात उपस्थित केले गेले. तसेच आता या याचिकेवर (petition) पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार असून या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या