Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र नवीन संसद भवन सेंट्रल हॉलमध्ये लावा - भुजबळ

बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र नवीन संसद भवन सेंट्रल हॉलमध्ये लावा – भुजबळ

मुंबई | Mumbai

हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवन (New Parliament Building) सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात यावे यासाठी राज्यशासनाने केंद्र शासनाकडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे…

- Advertisement -

याबाबत भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख आणि प्रसिध्द संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे. मराठी माती आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं.

तसेच जगाच्या पाठीवर असे काही प्रभावी नेते होऊन गेले त्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या ( Maharashtra) जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे थोर महापुरूष बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे संसद भवनामध्ये येणाऱ्या सन्माननीय लोकप्रतिनिधींना सदैव प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या