... तर भुजबळ कधीच मुख्यमंत्री झाले असते - उद्धव ठाकरे

... तर भुजबळ कधीच मुख्यमंत्री झाले असते - उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

छगन भुजबळ हे शिवसेनेत (Shiv Sena) असते तर कधीच मुख्यमंत्री झाले असते असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'अमृत महोत्सव' कार्यक्रमात ते बोलत होते...

यावेळी ते म्हणाले की, छगन भुजबळ हे आपल्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत (Election) पराभवाला सामोरे गेल्यानंतरही ते आज जिद्दीने उभे आहेत. बेळगावमधील फोटो कोणी पाहिला तर माझ्यावर पुन्हा एकदा हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप होईल, असे ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, नियमतीच्या मनात काय असते हे कोणालाही माहिती नसते. आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची नियतीची इच्छा आहे. प्रत्येकाचे वय वाढत असते. माणूस वयाने मोठा होत असतो. पण तो जेव्हा विचारांनी थकतो तेव्हा तो वृद्ध होतो. अडीच-तीन वर्षांपूर्वी आपण महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) रुपात एक नवे समीकरण जन्माला घातले. ते यशस्वीपणे चालवले होते. मात्र हे पाहून एखाद्याला पोटशूळ उठणे साहजिक आहे. याच कारणामुळे आता सरकार पाडण्यात आले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट (Shinde Group ) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात (Court) जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसे मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटाला दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com