Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात करोनाचा उद्रेक! भुजबळांनी बोलावली तातडीची बैठक

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक! भुजबळांनी बोलावली तातडीची बैठक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात गेल्या १८ दिवसांपासून करोनाचा (Corona) वाढता उद्रेक बघायला मिळत आहे. २५ डिसेंबरला उपचार घेत असलेल्या ४४७ रुग्णांची संख्या १८ दिवसात ७ हजार ८२४ पर्यंत पोहचली आहे. तब्बल १७ पटीने वाढलेली ही संख्या ओमायक्रॉनचा (Omicron) धोका विशद करत आहे…

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने आढावा बैठक बोलावली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) असो, व्हेंटिलेटर (Ventilator) असो किंवा आणखी महत्वाच्या बाबींची ते माहिती घेणार आहे.

या विषाणूचा फैलाव जरी जोरात असला तरी यात मृत्यू होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. तरीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात ४ लाख ८ हजार १७८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

सद्यस्थितीत ७ हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ८ हजार १७८ करोनाबाधितांना (Corona) डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १५७, बागलाण ३४, चांदवड १९, देवळा १६, दिंडोरी २४३, इगतपुरी ४६, कळवण ४०, मालेगाव २०, नांदगाव ६४, निफाड ४६८, पेठ ०४, सिन्नर ११०, सुरगाणा १३, त्र्यंबकेश्वर २५, येवला २५ असे एकूण १ हजार २८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) क्षेत्रात ६ हजार ८८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात१३८ तर जिल्ह्याबाहेरील ३१४ रुग्ण असून असे एकूण ७ हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २४ हजार ७६८ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १०४, बागलाण १२, चांदवड १४, देवळा ०६, दिंडोरी ७०, इगतपुरी २३, कळवण ०७, मालेगाव ०६, नांदगाव २२, निफाड ७९, पेठ ०३, सिन्नर ४०, सुरगाणा ०९, त्र्यंबकेश्वर १४, येवला १९ असे एकूण ४२८ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या