Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापालकांनी बालकाप्रमाणे वागू नये, गुलाबराव पाटलांचा भुजबळांना टोला

पालकांनी बालकाप्रमाणे वागू नये, गुलाबराव पाटलांचा भुजबळांना टोला

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)आणि शिवसेना आमदार सुहास कांदे (suhas kande)यांच्यातील निधी वाटपाचा वाद न्यायालयात गेला. त्यानंतर या प्रकरणात अंडरवर्ल्डकडून ()धमकी आल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला. या प्रकरणात शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil)यांनी प्रथमच भूमिका मांडली.

रणबीर-आलिया का पोहचले जोधपूरला?

- Advertisement -

नांदगाव मतदासंघातील जिल्हा नियोजन विकास समितीमधील विकासनिधी वाटपावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात झालेला वादाचा मुद्दा अंडरवर्ल्डपर्यंत पोहचला आहे. पालकमंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात आपण दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीने (chhota rajan)धमकी मिळाल्याची तक्रार कांदे यांनी पोलिसांकडे केल्याने खळबळ उडाली आहे. छोटा राजनचा पुतण्या अभय निकाळजे याने फोनवरून धमकी दिल्याने या वादाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात गुलाबराव पाटील म्हणाले, सुहास कांदे यांनी धमकीला घाबरू नये. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. भुजबळ आणि कांदे यांनी बसून वाद सोडवावा. पालकांनी बालकाप्रमाणे आणि बालकाने पालकाप्रमाणे वागू नये, असा टोलाही त्यांनी भुजबळांना लगावला.

धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

जळगाव जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान

जळगाव जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान झालं आहे. अनेक घरं आणि शेतजमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासाठी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकाचा पिकपेरा वेगळा असल्याने सरसकट मदत करता येणार नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. सरसकट पंचनामे करण्यात येत आहेत. म्हणजेच ओला दुष्काळ म्हणून सरकारने या अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. कॅबिनेटमध्ये पूर्ण माहिती आल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीसाठी केंद्राने मदत देण्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा संकटाच्याकाळात केंद्र सरकारने राज्याला पैसे द्यायला हवे. मात्र, केंद्र काही मदत देत नाही, असं ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या