भुजबळ म्हणतात, आमदार सुहास कांदे यांचे उच्च न्यायालयात जाणे चुकीचे...

भुजबळ म्हणतात, आमदार सुहास कांदे यांचे उच्च न्यायालयात जाणे चुकीचे...
छगन भुजबळ

नांदगावमधील पूरस्थितीबाबत झालेल्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)आणि आमदार सुहास कांदे (suhas kande)यांच्यात सुरु असलेला वाद वाढतच आहे. आज पत्रकार परिषद घेऊन आमदार सुहास कांदे (suhas kande) यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यांवर टीकेच्या फैरी झाडल्या. त्यानंतर लागलीच छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत सुहास कांदे यांना संपुर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले. आक्रमक असलेले भुजबळ आजच्या पत्रकार परिषदेत बॅकफूटवर आलेले दिसले. या प्रकरणात चर्चेची तयारी दर्शवत मुख्यमंत्री जो निर्णय देतील, तो मान्य असणार असल्याचे सांगितले.

छगन भुजबळ
आमदार कांदेचा थेट मंत्री भुजबळांवर वार, पालकत्वच काढण्याची मागणी

काय म्हणाले पालकमंत्री छगन भुजबळ...

  • आमदार सुहास कांदे यांचे उच्च न्यायालयात जाणे चुकीचे आहे. आपले मुख्य न्यायाधीश उद्धव ठाकरे आहेत. ते मला सांगतील. चुकले असेल तर मी चुकले म्हणत माघार घेईल.

  • आमदार सुहास कांदे यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या आम्ही दूर करु. मी त्यांना पुर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे.

  • भाई विद्यार्थीच्या प्राचार्य पदावर त्यांनी बसवले. त्याबद्दल मी आभारी आहे.

  • भुजबळविरुद्ध शिवसेना असा संघर्ष नाही.

  • पालकमंत्री भुजबळ नको? या मागणीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील.

  • माझ्या दृष्टीने हा वादा संपला. मी यावर अधिक चर्चा करू शकत नाही. तसेच, जे काही बोलायचे आहे ते आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलू.

  • निवडणूक आली की वेगवेगळे पक्ष युती करतात. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करणार आणि शेवटी जनता ठरवेल कोण योग्य.

  • बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबीयांना राहिला नाही, यांनाच का? असा सवालही करत माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम दिला आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

  • पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणे हे माझे काम आहे. यावरून हायकोर्टात जाणे योग्य नाही. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत, हे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटले तर ते पालकमंत्री बदलतील

छगन भुजबळ
पालकांनी बालकाप्रमाणे वागू नये, गुलाबराव पाटलांचा भुजबळांना टोला

Related Stories

No stories found.