Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यातीन कृषी कायदे रद्द : पालकमंत्री भुजबळ म्हणाले...

तीन कृषी कायदे रद्द : पालकमंत्री भुजबळ म्हणाले…

गुरुनानक जयंतीच्या दिवशी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द (agriculture bill)केले हे स्वागतार्य आहे. उत्तर प्रदेशसह आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेणे लवकर घेणे अपेक्षित होते. पण ठिक आहे ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी मोदी सरकारला (modi government)लगावला.

मागील एक वर्षापासून काळे शेतकरी कायदे रद्द करा यासाठी महात्मा गांधींच्या अंहिसेच्या मार्गाने दिल्लीच्या वेशीवर शेतकरी लढा देत आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा यासंह देशातील शेतकरी उन्ह, थंडी व पावसात आपल्या मागणीवर ठाम राहिले. आंदोलनात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. हे दुर्देवी होते. सरकारने हा निर्णय अगोदर घेणे आवश्यक होते. मागे झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसला. आगामी युपीसह इतर राज्यातील निवडणुका भाजपाला जड गेल्या असता. त्यामुळे उशीराने का होईना हा निर्णय घेतला. जे शेतकरी या आंदोलनात शहिद झाले त्यांना माझी श्रध्दांजली. शेतकर्‍यांची मागणी मान्य झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या