Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याही धाड अपेक्षितच; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

ही धाड अपेक्षितच; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

नाशिक | Nashik

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी आज सकाळी ईडीची (ED) टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी ही राऊतांची चौकशी होण्याची शक्यता आहे. राऊतांच्या घरी ईडीची अधिकारी दाखल झाल्याने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

या प्रकरणावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, राऊतांच्या घरी ईडीची रेड (ED Raid) पडणे हे अपेक्षित होते. एकदा ईडीचा तपास सुरु झाला की, ऑफिस, घरांवर धाडी पडतात. त्यांच्या तपासाचा तो भाग आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राऊतांना १०१ टक्के अटक होणार; नवनीत राणांचा दावा

अर्जुन खोतकर यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांचे संपूर्ण वक्तव्य ऐकले तर त्यांनी स्पष्टच सांगितले आहे. मी आणि माझे कुटुंबीय अडचणीत आलो आहे म्हणून मला शिंदे गटात जायचे आहे. आतापर्यंत आपण म्हणत होते आता जाणारे स्पष्टपणे बोलत आहेत, असे भुजबळ म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या