Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमधील निर्बंध शिथिलतेसंदर्भात भुजबळ म्हणाले...

नाशिकमधील निर्बंध शिथिलतेसंदर्भात भुजबळ म्हणाले…

नाशिक:

राज्यातील (Maharashtra )अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही आटोक्यात आली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील नाशिकसह २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल (restrictions relaxation) करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली होती. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (nashik) काय सुरु राहणार? याचा निर्णय घेण्यासाठी आज बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

- Advertisement -

CBSE 12th Result बारावीचा निकाल जाहीर, वेबसाइट क्रॅश झाल्यास असा पहा निकाल

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीला पालकमंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal ) जिल्हाधिकारी सूरज मांढरे (suraj mandhare), महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागाची अधिकारी व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भीती अजून संपलेली नाही

भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले की “दुकानांना वेळ वाढवून द्या, शनिवार रविवार पैकी एकच दिवस बंद ठेवण्यात यावा, मॉलही ५० टक्के क्षमतेनं सुरू करावे, ज्या ठिकाणी शाळा सुरू आहेत तिकडे कॉलेजेकडेही लक्ष द्यावं लागेल, यासंदर्भात आमच्या चर्चा झाल्या. या चर्चा झाल्यानंतर एक टास्क फोर्स आहे तो देशात, राज्यात, परदेशात काय सुरू आहे याचा विचार करून एक निर्णय घेत असतो. परंतु भीती अजून संपलेली नाही. अस्थपाने सुरु करण्यासाठी एक दिवस लागणार नाही. परंतु सर्व विचार करुन निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात जे निर्णय घेतील, त्यानुसारच नाशिकमधील निर्णय आपण घेऊ.राज्य शासनाच्या निर्देशानुसार काही सुरु करण्याचे अधिकार आपणास नाही. परंतु बंद करण्याचे अधिकार आहे.

केरळमध्ये लॉकडाऊनची वेळ

पालकमंत्री म्हणाले, नुकतंच ऐकलं की केरळमध्ये दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचाच अर्थ परिस्थिती संपूर्ण सुधारली असा नाही. लोकांच्या या मागण्या आहेत आणि आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे. टास्क फोर्सची आता बैठक झाली आहे. त्यात जो काही निर्णय ठरला असेल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असंही त्यांनी नमूद केलं.

साहित्य संमेलन

नाशिकमधील साहित्य संमेलन होणार की नाही यावर भुजबळ म्हणाले, यासंदर्भातील निर्णय सर्वांनी मिळून घ्यावी. या प्रकरणत मला दिली जाणारी जबाबदारी मी पूर्ण करेल. पण संमेलनाला विविध भागातून सुमारे 2000 लोक येणार आहे, हे विसरुन चालणार नाही. यामुळे सध्याच्या परिस्थितीत ऑफलाईन संमेलन घेणं शक्य नाही .

२७७ शाळा सुरु

जिल्ह्यात कोरोना परिस्थितीवर पालमंत्री म्हणाले. जिल्ह्यात 850 माध्यमिक शाळा आहेत. त्यातील २७७ शाळा सुरु केल्या आहेत. शिक्षकांची rtpcr केल्या नंतर या शाळा सुरु झाल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील 335 गावात गेल्या एक महिन्यात एकही रुग्ण नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या