…तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवून पुन्हा एकत्र येऊ – भुजबळांचे सूचक वक्तव्य

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

राज्यातील १४ हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहे. तसेच येणाऱ्या काळात आता महापालिका निवडणुकादेखील होणार आहेत. राज्यात नव्याने उदयास आलेल्या महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार की स्वतंत्र लढणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.

असे असतानाच आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य करत ‘महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्या असे वाटत असले तरी प्रत्यक्ष जागा वाटपात किती तडजोड शक्य होईल, हे आज सांगणे कठीण आहे.

त्यामुळेच प्रत्येक पक्षाने आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवून नंतरही एकत्र येता येते असे पालकमंत्री भुजबळ म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून पुन्हा एकदा भाजपला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *