Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपालांसमोर भुजबळांची तुफान फटकेबाजी; पाहा व्हिडीओ

राज्यपालांसमोर भुजबळांची तुफान फटकेबाजी; पाहा व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यपाल एखाद्या कार्यक्रमाला येणे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सरकार येणे असे आहे. नाशिकला उद्योगनगरी वाढते आहे. राज्यपालांचे माझ्यावर खूप प्रेम आहे; पण ते माझे काही ऐकत नाहीत असे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister Chhgan bhujbal) यांनी म्हणतात सभागृहात हशा पिकला होता….

- Advertisement -

पालकमंत्री भुजबळ कालिदास कलामंदिर (kalidas kalamandir nashik) येथे आयोजित महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या (maccia) सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राम आणि नाशिक हे समीकरण आधीपासून जोडलेले आहे. परंतु रामबंधू यांनी रामाच्या नावाचा धंद्यात किंवा उद्योगात खूप चांगल्या प्रकारे केला असे म्हणत भुजबळांनी सर्वांनाच हसवले.

नाशिकला लाभलेल्या वारशाला यानिमित्त पुढे घेऊन जात आहोत. उद्योगधंदे येण्यासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत. मुंबई पुण्यानंतर आता पुढील विकास नाशिकमध्ये आहे हे सर्वांनी मान्य केले आहे.

राज्यातून मुखपट्टी निघाली आहे, मात्र राज्यपालांची पट्टी अजूनही तोंडावर आहे. पट्टी निघाली तर फोटो चांगला येतो असे एका उद्योजकाने या कार्यक्रमात सांगितले. तेव्हाही सभागृह लोटपोट झाले.

नाशिकमध्ये उड्डाणपूल,अंतर्बाह्य रिंग रोड, चौपदरी रस्त्यांचे जाळे, विमानतळ, पर्यटनाच्या सुविधा यासह पायाभूत सुविधांचा विकास आपण केला असून कनेक्टिव्हिटी निर्माण केली आहे. मुंबई पुण्यानंतर नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक आहे हे सर्वमान्य झाले आहे. नाशिकला अतिशय उत्तम असे वातावरण लाभले असून नाशिकमध्ये पर्यावरण पूरक उद्योग यावेत यासाठी प्रयत्न आहे. मुंबई पुण्यात ज्या सुविधा आहेत त्या सुविधा उत्तर महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यातील विजेच संकट महाराष्ट्र राज्यासमोर उभ असून त्यासाठी काल स्वतंत्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या संकटामुळे महाग वीज आपल्याला घ्यावी लागणार आहे. या घेतलेल्या विजेचा बोजा शेतकरी आणि उद्योजकांवर पडणार नाही याची दक्षता शासनाने घेतलेली आहे. एक खिडकी योजना अतिशय उत्तम रित्या राबविली जाईल यासाठी प्रशासनाने अधिक काळजी घेऊन योजना यशस्वीपणे राबविण्यात यावी असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या