Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकछगन भुजबळ 'होम क्वारंटाईन'; कार्यालयात करोनाचा शिरकाव

छगन भुजबळ ‘होम क्वारंटाईन’; कार्यालयात करोनाचा शिरकाव

नाशिक | प्रतिनिधी

राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना करोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची करोना चाचणी करण्यात आली.

- Advertisement -

यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले आहेत.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास करोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या