शेतकऱ्यांना मदत देण्याची सुबुद्धी सरकारला देवो; भुजबळांचे गणरायाला साकडे

Minister Chhagan Bhujbal
Minister Chhagan Bhujbal

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकार (MahaVikas Aghadi Government) कोसळल्यानंतर शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेल्या एकनाथ शिदेंच्या (Eknath Shinde)गटाने भाजपसोबत (BJP) सत्तास्थापन केली.

यानंतर मविआचे नेते सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) सातत्याने टीका करत आहेत. आज गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ (MLA Chhagan Bhujbal) यांनी शिंदे सरकारच्या कामकाजावर बोट ठेवत निशाणा साधला आहे.

ते म्हणाले कि, शिंदे सरकारला (Shinde Government) अतिृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्याला (Farmer) मदत देण्याची बुध्दी द्यावी अशी प्रार्थना विघ्नहर्त्याकडे केली. शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल आम्हाला आशा आहे. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच मागच्या तीन वर्षांपासून देशासह राज्यात करोनाचे संकट होत ते संकट थोडे कमी झाले आहे. देशावरील आणि राज्यावरील करोनाचे संकट दूर होण्यासाठी बाप्पाकडे साकडे घातले असून राज्यातील करोनाच्या संकटानंतर राज्याच्या हिताची कामे होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com