Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता छगन भुजबळ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

आता छगन भुजबळ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (suhas kande) आणि पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)वाद आता आणखीन वाढला आहे. ‘नाशिकला लाल दिवा आहे… उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो’, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी छगन भुजबळ यांना(chhagan bhujbal) दिला होता. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी संजय राऊत (sanjay raut)यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या शिल्पकारांमध्ये राऊत यांचा समावेश आहे. त्यामुळे आपण तयार केलेले शिल्प चांगले रहावे, याची काळजी शिल्पकाराने घ्यायला हवी, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी नांदगाव मतदारसंघाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलावं लागेल, असं भुजबळ म्हणाले. यापुढे जिल्हा परिषद आणि इतर निवडणुका आहेत त्याला जावे की नाही हे त्यांना विचारावे लागेल. नांदगाव मध्ये मी जे काम केलं ते त्याना माहित नसावं, कारण त्यांना गल्लीपासून दिल्ली पर्यंत कामं करावं लागतं. त्या मुळे मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी या मतदार संघात परत परत यावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या