छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

छगन भुजबळ
छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) दाखल करण्यात आले आहे....

व्हायरल इंफेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात ते दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल इंफेक्शन झाल्यानंतर भुजबळ यांनी घऱगुती उपचार केले होते. यानंतर त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबीरालाही उपस्थिती लावली होती. मात्र सोमवारी सकाळी त्रास वाढल्याने ते बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com