Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचेन्नईचा पंजाबवर दणदणीत विजय

चेन्नईचा पंजाबवर दणदणीत विजय

दुबई । वृत्तसंस्था

सलग तीन पराभवांमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या चेन्नईच्या संघाची गाडी अखेर रविवारी रूळावर आली.

- Advertisement -

पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला 179 धावांचे लक्ष्य दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. पंजाबच्या गोलंदाजांना घाम फोडत या दोघांनी चेन्नईसाठी आयपीएलमधील सर्वोत्तम सलामी दिली आणि 10 गडी राखत संघाला विजय मिळवून दिला.

पंजाबच्या डावात कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. मयंक अग्रवालला चांगली सुरूवात मिळाली पण तो 26 धावांवर तो बाद झाला. आज संधी मिळालेला मनदीप सिंगदेखील चांगल्या सुरूवातीनंतर 27 धावांवर माघारी परतला. त्यानंतर निकोलस पूरन आणि राहुल यांनी दमदार भागीदारी करून संघाला स्थैर्य दिले.

या दोघांनी 58 धावांनी भागीदारी केली. याचदरम्यान राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या फटकेबाजीकडे पाहता पंजाब 200पार पोहोचणार असें वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने दोन चेंडूत या दोघांना बाद केलें आणि चेन्नईला सामन्यात परत आणलें. ग्लेन मॅक्सवेल आणि सर्फराज यांना शेवटच्या तीन-चार षटकांत अपेक्षित फटकेबाजी जमली नाही, त्यामुळे पंजाबला दोनशेपार मजल मारता आली नाही.

या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसन आणि डु प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. पंजाबकडून ख्रिस जॉर्डन 11वे षटक टाकायला आला. त्या षटकात चौकार मारत आधी शेन वॉटसनचे आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जॉर्डनच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावत त्याने 31 चेंडूत अर्धशतक ठोकलं. आयपीएलमधील हे वॉटसनचें विसावें अर्धशतक ठरलें. त्याने माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शच्या विक्रमाशी बरोबरी केली.

त्याच षटकात पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत डु प्लेसिसने 33 चेंडूत अर्धशतक ठोकलें. त्याचें हे आयपीएलमधीलं 15वें अर्धशतक ठरलें. त्याने कायरन पोलार्ड आणि मायकल हसीच्या कामगिरीशी बरोबरी साधली. या दोघांनी आपली विकेट न गमावता संघाला 179 धावांचें लक्ष्य सहज गाठून दिलें. डु प्लेसिसने नाबाद 87 तर वॉटसनने नाबाद 83 धावा केल्या. चेन्नईच्या संघाची ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम सलामी भागीदारी ठरली.

- Advertisment -

ताज्या बातम्या