Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू, महिन्याभरातील दुसरी घटना

कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू, महिन्याभरातील दुसरी घटना

भोपाळ | Bhopal

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू (Cheetah Death) झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

रविवारी चार वाजण्याच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘उदय’ असं या चित्त्याचं नाव असून, त्याचे वय सहा वर्ष होते.

Sachin Tendulkar Birthday : सचिन-अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी.. कुठे झाली पहिली भेट?

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शनिवारी त्याची तब्येत ठणठणीत होती. रविवारी अचानक त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आज त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकणार आहे.

चित्ता दगावण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. नामिबियातून आणलेली चित्त्याची मादी साशाचा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला होता. ती कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेल्या चित्यांच्या पहिल्या तुकडीतील होती.

‘तो’ बिबट्याचा हल्ला नाही, तर हत्या; बोटा परिसरातील प्रकरणाला वेगळं वळण

दरम्यान, भारत सरकारने दक्षिण अफ्रिकेतून १२ चित्ते भारतात आणले होते. १८ फेब्रुवारी रोजी त्यांना मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. दरम्यान, महिन्याभरात दोन चित्त्याचा मृत्यू झाल्याने सरकारच्या प्रोजेक्ट चितावर सवाल उपस्थित केले जात आहेत.

धक्कादायक! दुचाकीने धडक दिल्याने निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या