स्टॉक मार्केट समजून घेण्यासाठी नाशकात आले आणि झाला विश्वासघात...वाचा सविस्तर

स्टॉक मार्केट समजून घेण्यासाठी नाशकात आले आणि झाला विश्वासघात...वाचा सविस्तर

नाशिक । प्रतिनिधी

स्टॉक मार्केट शिकण्याच्या तसेच गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने बेळगाव येथून दोघांना नाशिकमध्ये बोलावून शितपेयामध्ये गुंगीचे औषध देत त्यांच्याकडील 80 हजार रूपयांच्या किंमती वस्तू लुटल्याची घटना उघडकीस आली आहे....

गोपाळ दामोदर अग्रवाल, संभाजी अण्णासाहेब पवार, सचिन पांडुरंग भोसले, संचित अग्रवाल, महेश थोरात (रा. सर्व नाशिक)अशी संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी अभिजीत श्रीकांत महेंद्रकर (35, रा. बेळगाव) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांच्याविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली.

अभिजीत यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी महिनाभरापुर्वी अभिजीत यांची ओळख करून स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्यांना बेळगावहून नाशिकला बोलवले.

यासाठी त्यांचा खर्च देण्यात आला. यावेळी अभिजीत यांच्यासोबत त्यांचा मित्र प्रविण कुमार खोत देखील आले होते. दोघे नाशिकमधील महात्मागांधी रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांना शुक्रवारी दुपारी महेश थोरात याने कारमध्ये बसवून घोटी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये नेले.

तेथे संशयित अग्रवाल याने अभिजित यांच्याकडून स्टॉक मार्केटची माहिती समजून घेतली. त्यानंतर गोपाळ अग्रवाल याने दोघांनाही शितपेय दिले, मात्र ते पिल्याने दोघांनाही गुंगी आली.

दरम्यान, गोपाळ अग्रवाल यांच्या सांगण्यावरुन तेथील बाऊन्सर संभाजी पवार, सचिन भोसले, महेश थोरात यांनी दोघांना नाशिकला सोडून देण्याच्या बहाण्याने घोटी येथील जंगलात नेले व तेथे संभाजी पवार याने पिस्तुलीचा धाक दाखवून दोघांकडील रोकड, लॅपटॉप, मोबाइल, पाकिट असा ऐवज लुटला.

त्यानंतर संशयितांनी लॅपटॉप अभिजीत यांच्या पुणे येथील मित्राकडे पोहचवला. मात्र पैसे, महत्वाची कागदपत्रे, मोबाइल दिले नाही. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com