
नवी दिल्ली | New Delhi
मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) बालाघाटमध्ये आज दुपारच्या सुमारास एक चार्टर विमान (Charter aircraft) कोसळल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, अपघातानंतर हे चार्टर विमान जळून खाक झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या (Gondia) बिरसी विमानतळावरील प्रशिक्षणार्थी विमान कोसळून पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेशमधील बालाघाटच्या किरणापूर भागातील भुक्कूटोला येथे या चार्टर विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आले नाही.
या अपघातात पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पायलट मोहित तर, महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे (pilot) नाव वरसुका असे सांगण्यात येते.
बालाघाट (Balaghat) जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुक्कुटोला येथील घनदाट जंगलात हा अपघात घडला आहे. जवळपास शंभर फूट खोल दरीत दुर्घटनाग्रस्त विमानाचे भाग सापडले आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच बालाघाट पोलीस घटनास्थळी रवाना झाले आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले.