Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजय श्रीराम... ! नाशकात रथोत्सवाचा जल्लोष; पाहा व्हिडिओ

जय श्रीराम… ! नाशकात रथोत्सवाचा जल्लोष; पाहा व्हिडिओ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे. श्रीरामनवमीनिमित्त ( Shri Ramnavmi)काढण्यात येणारी रथयात्रा ही प्रत्येक नाशिककरासाठी औत्सुक्याचा विषय आहे. तब्बल सव्वादोनशे वर्षांची नाशिकच्या रथयात्रेची परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे.

- Advertisement -

कामदा एकादशीला रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक काढण्यात येते. या रथयात्रेचा इतिहासही तितकाच रोमहर्षक आहे.काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून ‘जयसीता रामसीता’चा गजर करीत या मिरवणुकीला प्रारंभ झाला. उत्सवाचे मानकरी समीर बुवा पुजारी यांच्या हस्ते श्री राम रथ व गरुड रथ यांचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. रथयात्रा सुरू होण्यापूर्वी श्रीरामाच्या मूर्ती व पादुकांची स्वावाद्य पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर श्रीराम रथात प्रभू श्रीरामाची भोगमूर्ती व गरुड रथात प्रभू श्रीरामाच्या चरण पादुका ठेवून रथाची आरती करण्यात आली.

चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून श्री काळाराम संस्थान श्री काळाराम मंदिर येथे वासंतीक नवरात्र महोत्सव सुरू झाला होता. त्या महोत्सवाची सांगता रविवारी श्रीराम रथ व गरुड रथोत्सवाने झाली. रथोत्सवाच्या कार्यक्रमासाठी नासिक करांचा उत्साह शिगेला पोहोचला होता तर यशस्वी होण्यासाठी सरकारी यंत्रणा देखील झटून कामाला लागल्या होत्या.

श्रीराम रथोत्सव समितीतर्फे मार्गातील सर्व रस्ते, पताका, झालरी व स्वागत कमानी लावून सुशोभित करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी गुढ्या, तोरणे उभारण्यात आले आहेत . महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आले आहेत .नाशिककरांचे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्यामुळे वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला आहे. सर्वच वाहतूक शहराच्या बाहेरून वळवण्यात आली . राम रथाचे ढोल ताशाचा गजरात गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रथोत्सवाच्या सुरुवातीला फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या