
नाशिक । प्रतिनिधी Nashik
निमाणी परिसरातील ( Nimani Area )वाहतूक कोंडी( Traffic) फोडण्यासाठी सिटीलिंकच्या 62 बसफेर्या ( Citilink Bus routes) जागीच रस्ता क्रॉस करण्याऐवजी जुना आडगाव नाका येथून यू-टर्न घेणार आहेत, तर 34 बस फेर्या तपोवनातून पुढे जाणार आहेत. त्यामुळे अडीच किलोमीटरने बसचे अंतर वाढणार आहे.
मात्र, वाढीव किलोमीटरचा आर्थिक भार प्रवाशांवर टाकण्यात येणार नाही. नवीन नियोजनानुसार निमाणी स्थानकातून सुटणार्या काही बसेस आडगाव नाक्याकडे जाऊन तेथून पुन्हा माघारी रिटर्न होऊन पुढील प्रवास करणार आहे.
पंचवटीतील निमाणी परिसर हा अतिशय वर्दळीचा आहे. त्यातच शहर बससेवेचे मुख्य स्थानक असल्याने अनेक बसेस बाहेर पडून रस्ता क्रॉस करतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
बसस्थानकातून बाहेर पडून बसला रस्ता क्रॉस करावा लागत आहे. त्यामुळे 8 मार्गावरील 62 बसफेर्या निमाणीतून बाहेर पडून रस्ता क्रॉस करण्याऐवजी आता पंचवटी डेपो कॉर्नर (जुना आडगाव नाका) येथून टर्न घेऊन त्यानंतर नियोजित मार्गे पुढे रवाना होतील. त्याचप्रमाणे 101 ए, 102 बी, 129 ए, 130 ए या चार मार्गावरील 34 बसफेर्या तपोवनात हलविण्यात आल्या आहेत. सदर बसेस देखील निमाणी येथे न येता दुसर्या मार्गाने तपोवनात जातील व तेथूनच मार्गस्थ होतील.