मध्यवर्ती कारागृहात नोंदवहीमध्ये खाडाखोड; तिघांवर गुन्हा दाखल

मध्यवर्ती कारागृहात नोंदवहीमध्ये खाडाखोड;  तिघांवर गुन्हा दाखल

नाशिक रोड | प्रतिनिधी Nashikroad

येथील मध्यवर्ती कारागृहात ( Central Jail ) अधिकाऱ्यांनीच नोंदवहीमध्ये खाडाखोड करून तसेच व्हाइटनर( Whitner ) लावून शिक्षा वारंट न्यायाधीन कालावधी माफीचे दिवस बायो दिवस कालावधी या नोंद वही वर खाडाखोड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अप्पर पोलीस महासंचालकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलिस ठाण्यात ( Nashikroad Police Station )कारागृह अधिकारी सतिश गायकवाड यांनी तीन अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून नाशिक रोड पोलिस ठाण्यात या तीन जना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी श्रेणी 1 शामराव आश्रुबा गिते. तत्कालीन तुरुंग अधिकारी श्रेणी 2 माधव कामाजी खैरगे. तत्कालीन वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डाबेराव या तिघांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस महासंचालकांचा आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजलिंगम गुंटूका याला 14 दिवसाची संचित रजा मंजूर असताना 409 दिवस फरार होता. पोलिसांनी हजर केले मात्र नोंदवही मध्ये केवळ 44 दिवस उशीराने आल्याचे दाखविण्यात आले. व्यंकट रामलू व्यकटया या कैद्याला रजेवर सोडण्यात आले. मात्र हा नियत कालावधीत हजर न होता 3 हजार 435 दिवस उशिराने हजर झाला. मात्र नोंदवहीमध्ये खाडाखोड करून 2 हजार 706 दिवस दाखविण्यात आले. विलास बाबू शिर्के या कैद्याला माफिच्या दिवसांची नोंद 1 हजार 407 असताना खाडाखोड करुन 2हजार 127 दिवसाची करून कारागृहातून मुक्त करण्यात आले.

हे प्रकरण समोर आल्यानंतर आता मागील काही दिवसांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. यामध्ये आणखी काय माहिती मिळते? हे लवकरच समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा अधीक तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com